Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना गावबंदी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सरपंच संघटनेचा स्पष्ट इशारा आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. १७ नोव्हेंबर २०२३) - ...

सरपंच संघटनेचा स्पष्ट इशारा
आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १७ नोव्हेंबर २०२३) -
        कोरपना तालुक्यांतील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात दत्तक गावातील सरपंच संघटनेचे आमरण उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विविध मागण्यांबाबत तोडगा काढायची तयारी दर्शवली नाही आहे. उलट अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे काही अधिकारी वैयक्तिकरित्या काही सरपंचांना फोन करून दबाव तंत्राचा उपयोग करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय दत्तक गाव सरपंच संघटनेने घेतला आहे. (Ultratech Cement Company)


        नांदा फाटा येथे दिनांक 13 नोव्हेंबर पासून तीन दिवस सरपंच संघटनेने साकडे उपोषण केले, मात्र अल्ट्राटेक सिमेंट कंपनी चर्चेसाठी आली नसल्याने शेवटी आमरण उपोषण सरपंच संघटनेने सुरू केले. त्याचबरोबर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे काही अधिकारी वैयक्तिकरित्या सरपंचांना फोन करून दबाव तंत्राचा उपयोग करीत आहे. त्यामुळे स्थानीय सरपंच उपसरपंच साहित स्थानीय नागरिकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे. सिमेंट कंपनी अधिकारयांनी कृपया दत्तक गावात येऊ नये अशी स्पष्ट सूचना सरपंच संघटना परिषदे तर्फे कंपनी प्रशासनाला दिला असल्याचे रत्नाकर चटप यांनी सांगितले. सरपंच संघटने तर्फे कंपनीकडे प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात सी एस आर निधी द्यावा, गावातील पांदण रस्त्यांचे बांधकाम करावे, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतर्फे होत असलेली लाईम स्टोंनची वाहतूक थांबवावी, आयटीआय उत्तीर्ण बेरोजगारांना अप्रेंटिस करिता भरती प्रक्रिया सुरू करावी, त्यासोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा, गावागावात प्रदूषण संयंत्र बसवावे अश्या विविध मागणीसाठी आमारण उपोषण सुरू केले असुन आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. (aawarpur) (gadchandur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top