राजुरा (दि. १६ नोव्हेंबर २०२३) -
गांधी चौक राजुरा येथे आदिवासी अस्मितेचे प्रतिक क्रन्तिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त शहर युवक काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी शहरात निघालेल्या आदिवासी समाज बांधवांच्या रॅलीचे स्वागत करून शरबत व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष श्रीकांत चिट्टलवार, अ.भा.आ.वि. परिषद शाखा राजुरा जिल्हा चंद्रपूर युवा जिल्हा कार्यध्यक्ष रविंद्र आर पी आत्राम व सोनिया नगर मित्र परिवार चे अंतिम जंगते, रमेश मेश्राम, ओम आत्राम, रितिक लांडे, साहिल लांडे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha) (bhagwan birsa munda jayanti)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.