Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जेष्ठ नागरिकांसह आमदार किशोर जोरगेवार यांनी साजरी केली दिवाळी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्नेहमिलन व फराळ कार्यक्रमाचे आयोजन आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १९ नोव्हेंबर २०२३) -         दिवाळी निमित्त आमदार किशोर जोरगेवार ...

स्नेहमिलन व फराळ कार्यक्रमाचे आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १९ नोव्हेंबर २०२३) -
        दिवाळी निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी जेष्ठ नागरिकांच्या दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी आयोजित या स्नेहमिलन कार्यक्रात जेष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार, माता महाकाली सेवा सामोतीचे सचिव अजय जयस्वाल, माजी नगराध्यक्ष डाॅ. सुरेश महाकुलकर, डाॅ. अशोक वासलवार, डाॅ. किर्तिवर्धन दिक्षित, विजय चंदावार, श्याम धोपटे, कल्पना पलीकुंडावार, सुर्यकांत खनके, उमेश आष्टनकर, डाॅ. रजनिकांत भलमे, अॅड. विजय मोगरे, अॅड. दत्ता हजारे, पसायदान जेष्ठ नागरिक संघाचे विश्वनाथ तामगाडगे, बिंदुबाबू बडकेलवार, द्रोपती काटकर, राधाकृष्ण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर गुन्नुरवार, विनेश रामानुजनवार, विलास बडवाईक, महादेव पिंपळकर, अशोक संगीडवार, वासुदेव सादमवार, पुरुषोत्तम राऊत, माणिकराव गोहोकार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. (Diwali Snehmelan) (MLA Kishore Jorgewar)

        सध्या सर्वत्र दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहाज साजरा केल्या जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही यंदाची दिवाळी ज्येष्ठ नागरिकांसह साजरी करत त्यांना फराळासाठी घरी आमंत्रित केले होते. यावेळी पार पडलेल्या स्नेहमीलन कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचाही उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी विविध विषयांवर आमदार किशोर जोरगेवार यांनी ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली. खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

        जेष्ठ नागरिकांसह दिवाळी साजरी करतांना आनंद होत आहे. दरवर्षी दिवाळी निमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. जेष्ठांसोबत वेळ घालवून त्यांच्या विचारातून आलेल्या सूचना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहे. आपल्याकडे विचारांची मोठी ठेवी आहे. आपल्या विचारांचा उपयोग समाज परिवर्तनासाठी होणे अपेक्षित आहे. आपल्याला भेटल्या नंतर वैचारिक शक्तीत वाढ होते. अनेक नव्या गोष्टी आपल्याकडून शिकायला मिळते असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींचीही मला कल्पना आहे. जेष्ठ नागरिकांनी एकत्रित येत बहुमुल्य विचारांची देवाण घेवाण करावी यासाठी मतदार संघातील जेष्ठ नागरिक संधांचा विकास करण्याचे काम आपल्या वतीने सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (chandrapur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top