Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना तहसील वर धडकला शेतकरी मोर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. ३ नोव्हेंबर २०२३) -         शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाड...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ३ नोव्हेंबर २०२३) -
        शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपना च्या वतीने शेतकरी नेते, माजी आमदार अँड. वामनराव चटप (Adv. Wamanrao Chatap) यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

        अतिवृष्टीत पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, खरवडून गेलेल्या शेतीला एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, परसोडा येथील प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना पट्टे देण्यात यावे, शेती पंपाला पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा, केंद्र सरकारने विदर्भ राज्य ची तातडीने निर्मिती करावी, गडचांदूर आदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात यावे, जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण करू नये आदीसह पंधरा मागण्याचे निवेदन तहसीलदार कोरपना यांना देण्यात आले. या मोर्चाला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले , माजी समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, डॉ. भास्करराव मुसळे, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत मालेकर, मदन सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे, अरुण रागीट, विकास दिवे, दशरथ बोबडे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अँड. श्रीनिवास मुसळे, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष नरेश सातपुते, बंडू राजूरकर, सुभाष तुरानकर, प्रवीण गुंडावार, अनंता गोडे, भास्कर मत्ते, रवी गोखरे, शब्बीर जहागीरदार, पद्माकर मोहितकर, रत्नाकर चटप, सचिन बोंडे, विजय धानोरकर आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी - शेतमजुर उपस्थित होते (korpana) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top