Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बेरोजगारांचे आयुष्याच्या भाकरीसाठीचे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १५ ऑक्टॉबर २०२३) -         स्थानिक संविधान चौकात बेरोजगारांचे आयुष्याच्या भाकरीसाठीचे आंदोलन करण्यात आल...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १५ ऑक्टॉबर २०२३) -
        स्थानिक संविधान चौकात बेरोजगारांचे आयुष्याच्या भाकरीसाठीचे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने 4,18 व 22 सप्टेंबर 2023 ला एकाच महिन्यात वेगवेगळे शासन निर्णय काढून युवकांचे स्वप्न भंग करण्याचा सपाटा लावला आहे. ज्यात नोकऱ्यांचे खाजगीकरण, शाळा दत्तक देणे, खासगी कंपन्यांना मान्यता देणे याचा समावेश आहे. तीन महिन्यासाठी खासगी तहसीलदार, अग्निवीर 4 वर्षासाठी व 11 महिन्यासाठी पोलिस शिपाई नियुक्ती करीत आहे. स्थायी नोकरी समाप्त करुन कंत्राटी तत्वावर फिक्स टर्म एम्प्लायमेंट देऊन युवकांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम शासन करित आहे. याविरोधात हे आंदोलन उभारण्यात आले. जर स्थायी नोकरी नसेल, शिक्षण नसेल तर युवकांना चाय, समोसे, फळे, चिवड़ा, गुपचूप, पकोडे, फळ विकण्यापासून पर्याय उरणार नाही म्हणून या आंदोलनात युवकांनी प्रतिकात्मक दुकाने लावून दिले शासनाचा निषेध आगळ्यावेगळ्या पद्धतीने नोंदवित लोकांचे लक्ष वेधले. 

        तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन देऊन हे आंदोलन तात्पुरते समाप्त करण्यात आले. शासन जर निर्णय मागे घेत नसेल तर यापुढे तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी पुरोगामी विचार मंच राजुरा कडून देण्यात आला. यावेळी दिनेश पारखी, धीरज मेश्राम, अमोल राऊत, संतोष कुळमेथे, अँड. मारोती कुरवटकर, रवि झाडे, अमोल जगताप, धनराज उमरे, सुरेंद्र फुसाटे, नूतन ब्राम्हने,लक्ष्मण तुराणकर, जगदीश पिंगे, संजय चिड़े, मधुकर कोटनाके, रमेश आड़े, मेघराज ऊपरे, रामचंद्र रासेकर, बंडु कावळे, आसिफ सय्यद, बलवंत ठाकरे, सौरभ मादसवार, संभाजी साळवे, विजय मोरे, संजय चिडे,बळिराज धोटे, भूषण फुसे, केशव ठाकरे, नंदुभाऊ वाढ़ई, रेशमा चौहान, , अभिलाष परचाके, योगेश आपटे, राजकिरण तोगरे, प्रकाश घुले, नितेश चांदेकर तसेच समाज कल्याण हॉस्टेल, बोढे यांच्या घरच्या वाचनालयातील विद्यार्थी, कन्नमवार वाचनालय, सरदार पटेल वाचनालय यांनी आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top