Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: अभिजित वंजारी व सुभाष धोटे यांनी घेतला तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्षांच्या कामाचा आढावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. ८ ऑक्टॉबर २०२३) -         भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आदेशान्वये व प्रदेश काँग्रेसच्या निर्देशांनव्...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ८ ऑक्टॉबर २०२३) -
        भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आदेशान्वये व प्रदेश काँग्रेसच्या निर्देशांनव्ये चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुका कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक दिनांक ८/१०/२०२३ रोजी सर्किट हाऊस येथे घेण्यात आली. बैठकीला प्रदेश निरीक्षक प्रतिनिधी आमदार अभिजीत वंजारी (MLA Abhijit Vanjari), कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे (MLA Subhash Dhote), सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत, चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, अनु जाती जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, बल्लारपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, प्रा. अनिल शिंदे, चंद्रपूर शहर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, अल्पसंख्यांक सेल चंद्रपूर कार्याध्यक्ष मतीन कुरेशी, चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे, गोविंदा उपरे, उत्तमराव पेचे, रंजन लांडे, तुकाराम झाडे, अब्दुल करीम शेख, विजय गावंडे, प्रमोद चौधरी, खेमराज तिडके, नितीन गोहने, मिलिंद भोयर, प्रशांत काळे, रवी मारपलिवार, गुरुदास गुरूनुले, रमाकांत लोंढे, विनोद संकट, नगर विकास जिल्हाध्यक्ष रुचीत दवे, यांचेसह काँग्रेसचे शहर व ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते. 

        बैठकीत १२ तारखेला तालुकावाईज, प्रत्येक तालुक्याचा आढावा घेऊन दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने संपुर्ण माहिती तीन प्रतीत सादर करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी सर्व तालुकाध्यक्षांना दिल्या. तर आमदार अभिजित वंजारी यांनीही मार्गदर्शन केले आणि २० तारखेला होणाऱ्या  शिक्षक विद्यार्थी पालक यांच्या आंदोलनात आपणही सहभागी व्हावे असे सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व आमदार निवडून आणावे असे मार्गदर्शन केले. (chandrapur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top