Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नॅशनल पब्लिक स्कूल विद्यार्थिनीने केले ध्वजारोहण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मराठवाडा, राजुरा मुक्तिसंग्राम दिन साजरा आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १७ सप्टेंबर २०२३) -         दि. १७ सप्टेंबर रोजी समानता...

मराठवाडा, राजुरा मुक्तिसंग्राम दिन साजरा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १७ सप्टेंबर २०२३) -
        दि. १७ सप्टेंबर रोजी समानता बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित नॅशनल पब्लिक स्कूल बामनवाडा-राजुरा येथे मराठवाडा, राजुरा मुक्तिसंग्राम दिनानिमित्य इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी पूर्वी प्रवीण वाघमारे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समानता बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महमूद मुसा (Mahmood Musa), नदीम सर, समन्वयक शाबाज सर, प्रिन्सिपल रोहिणी रट्टे, शिक्षकेतर कर्मचारी, आयटीआय आणि नर्सिंग चे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकवर्ग उपस्थित होते. (Marathwada, Rajura Mukti Sangram Day celebrated)

        याप्रसंगी राजुरा मुक्ती संग्राम दिनानिमित्त समन्वयक शाबाज यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच प्रिन्सिपल यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. राजुरा मुक्ती संग्राम दिना बद्दल शुभेच्छा देत कार्यक्रम उत्साहात पार पडला. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top