Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार, शालेय वस्तु वाटप व वृक्षारोपण संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
यिरे फाऊंडेशन चंद्रपूरचा स्तुत्य उपक्रम आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे वरोरा (दि. १५ ऑगस्ट २०२३) -         यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर तर...
यिरे फाऊंडेशन चंद्रपूरचा स्तुत्य उपक्रम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
वरोरा (दि. १५ ऑगस्ट २०२३) -
        यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत वरोरा तहसील मध्ये जामगाव (बु) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले तसेच शाळेत व जामगाव (बु) ग्रा.पं. कार्यालय परिसरात वृक्षारोपण चा कार्यक्रम पार पडला. 

        यावेळी सदर उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सौ.मनिषा आसुटकर, ग्रामसेवक सौ.रंजनी घुगल, मुख्याध्यापक श्री. काळे सर तसेच समस्त ग्रापं सदस्य, शाळेतील सहशिक्षक, कर्मचारीवृंद उपस्थित होते. यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर (Jehovah Yire Foundation Chandrapur) व टिम ने वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत वृक्षारोपण केले. यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूरच्या या स्तृत्य उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. (aamcha vidarbha) (warora)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top