Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीना तडीपार करा - राजुरा मनसे तालुकाध्यक्ष आदित्य भाके यांची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ४ ऑगस्ट २०२३) -         राजुरा तालुक्यात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत चालली आहे. अवैध व्यवसायातून ग...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ४ ऑगस्ट २०२३) -
        राजुरा तालुक्यात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत चालली आहे. अवैध व्यवसायातून गोळीबार सारख्या घटना घडत आहे. या घटनांमध्ये निष्पाप व्यक्तींचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर तडीपारची कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष आदित्य भाके यांनी केली आहे. (Taluka President of Maharashtra Navnirman Sena Aditya Bhake)

        शहराला लागून कोळसा खाणी असल्याने परिसरात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. कोळसा तस्करी, डिझेल व किंमती लोखंडी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढली आहे. बदला घेण्यासाठी शस्त्रांचा सर्रास वापर केला जात आहे. देशी बनावटीच्या देशी कट्टा तुन गोळीबार करून जीव घेतले जात आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर वेळीच वाचक बसविणे गरजेचे झाले आहे. अशा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना तात्काळ तडीपारची कारवाई करा अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष आदित्य भाके यांनी केली आहे. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top