Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अँड.इंजि.प्रशांत घरोटे यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांना तीन चाकी सायकल वितरित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलिच्या माध्यमातून मुठरा, कढोली, चुनाळा येथील दिव्यांगांना मिळाला लाभ आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १९ जुलै २०२३) -        ...

वेकोलिच्या माध्यमातून मुठरा, कढोली, चुनाळा येथील दिव्यांगांना मिळाला लाभ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १९ जुलै २०२३) -
        वेकोलि बल्लारपूर क्षेत्र (WCL Ballarpur Area) यांच्या माध्यमातून तालुक्यातील मुठरा, कढोली, चुनाळा येथील तीन दिव्यांगांना तीन चाकी सायकल चे वाटप करण्यात आले. तालुक्यातील तीन दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल मिळावी याकरिता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अँड.इंजि.प्रशांत घरोटे यांच्या प्रयत्नातून मिळू शकली. वेकोलि बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत सावन झुला कार्यक्रमाच्या निमित्याने वेकोलि मुख्यालय नागपूर, विविध क्षेत्रीय कार्यालय, महिला अधिकारीगण, (General Manager of WCL Ballarpur Area) वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे महाप्रबंधक सब्यसाची डे तसेच अन्य वेकोलि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. दिव्यांगांनी अँड.इंजि.प्रशांत घरोटे व वेकोलिचे आभार मानले. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अँड.इंजि.प्रशांत घरोटे ने नेहमी सर्वसामान्यांच्या मदतीकरिता प्रयत्नशील असतात हे येथे विशेष. (Through Vekoli, disabled people from Muthara, Kadholi, Chunala got benefit) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top