Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर बसस्थानक थूटरा येथे बांधण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंची महसूलमंत्री विखे पाटील ला लिहिले पत्र  आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. २० जुलै २०२३) -      ...

आमदार सुभाष धोटेंची महसूलमंत्री विखे पाटील ला लिहिले पत्र 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २० जुलै २०२३) -
        चंद्रपूर जिल्हा, मौजा थुटरा, ता.राजुरा येथील सर्व्हे नं 264/1 आराजी 5.13 हे.आर. पैकी 1.20 हे.आर. जागा गडचांदूर येथे बसस्थानक करिता मंजूर करण्याच्या मांगणीचे पत्र राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे (ubhash Dhote) यांनी आज राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishana Vikhe Patil) यांना विधानभवन कार्यालय (मुंबई) येथे सुपूर्द केले. सदरहू पत्र महसुल व वने विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना "प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावा", या रिमार्कसह अग्रेसारीत करण्यात आले आहे. (MLA Subhash Dhote's letter to Revenue Minister Radhakrishana Vikhe Patil) (Korpana)

        याबाबत अधिकची माहिती अशी की गडचांदूर हे कोरपना व जिवती तालुक्यातील बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या जवळपास 40 हजाराच्या आसपास असून परिसरात 4 सिमेंट कारखाने अस्तित्वात आहेत, त्यामुळे मोठया प्रमाणावर लोकांची वर्दळ असते. सदरहू ठिकाणी बस स्थानक नसल्याने शालेय विद्यार्थी, आबालवृद्ध व सर्वसामान्य नागरिक यांची मोठी गैरसोय होत आहे. अशी माहिती आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.

        गडचांदूर येथे बसस्थानक बांधकामास जागा मंजुरी बाबतचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी, चंद्रपूर यांनी अवर सचिव, महसुल व वन विभाग यांचेकडे सन १३ ऑगस्ट २०१९ व २५ ॲक्टोबर २०२१ रोजी सादर केला आहे. यावर लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आमदार धोटे यांनी व्यक्त केली आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top