Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिवती तालुक्यात गुलाबी वादळ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवती तालुक्यातील शेणगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे जिवती (दि.८ जुलै २०२३) ...

जिवती तालुक्यातील शेणगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
जिवती (दि.८ जुलै २०२३) -
        भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभा क्षेत्रात जिवती तालुका परिसर शेनगाव येथे राजुरा विधान सभाक्षेत्र समन्वयक आनंदराव वाय अंगलवार (aanandrao angalwar) यांचे अध्यक्षतेत, राजूरा तालूका समन्वयक संतोष कुळमेथे (santoshkulmethe), अजय साकिनाला, रेशमाताई चव्हाण (reshmatai chauhan), सविता वझे, मीनाक्षी मुन जिवती तालुका अल्पसंख्याक प्रमूख ईसलाम शेख, जिवती तालूका ग्रामीण समन्वयक शंकर आत्राम, भिमराव जुमनाके, बालाजी करले, गणेश शेंबडे, विजय राठोड इत्यादींचे उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व सदस्य नोंदनी कार्यक्रम संपन्न झाले.

        अध्यक्षीय भाषणातून राजुरा विधान सभाक्षेत्र समन्वयक आनंदराव वाय अंगलवार यांनी भारत राष्ट्र समितीचे प्रचार यात्रा चे दरम्यान राजुरा विधान सभा क्षेत्रात शेनगाव येथे के.सी.आर यांचे शेतकरी व समस्त मागासवर्गीय, व्यापारी, अल्पसंख्याक आदिवासी व दलित, वयोवृद्ध समाजासह सर्वांगीण समाजाचे विकास साधण्यासाठी तेलंगाणा विकास माॅडेल संपूर्ण देशात लागु करण्यास दूरदृषटीचे विचाराचे गुलाबी झेंडा घेऊन जनतेच्या दारी जात आहे. तेव्हा आपण सर्व केसी.आर यांचे आव्हानाला प्रतिसाद दयावे व पक्षात प्रवेश घेऊन भक्कमपणे पक्ष मजबुत करून आगामी काळात होऊ घातलेले सर्व निवडणुकीत सहभागी होण्यासाठी रणनिती आखावे असे जनतेला प्रेरित करून जागृत केले. यावेळी रेशमाताई चव्हाण, सविता वझे, संतोष कुळमेथे, अजय साकिनाला यानीही मनोगतं व्यक्त केले व शेकडो लोकाचे गळ्यात गुलाबी दुपट्टे घालून स्वागत केले. प्रास्ताविक भिमराव जुमनाके, संचालन गणेश शेंबडे यांनी केले व बालाजी करले यांनी आभार प्रदर्शन केले. (jiwati) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top