Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कुटुंबातील लोक पक्ष सोडून जात आहेत, आता तरी शरद पवारांनी आपले घर सांभाळावे - चंद्रशेखर बावनकुळे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागपूर (दि. ६ जुलै २०२३) -         कुटुंबातील लोक सोडून जात आहेत, आता तरी शरद पवारांनी आपले घर सांभाळावे अशी ...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर (दि. ६ जुलै २०२३) -
        कुटुंबातील लोक सोडून जात आहेत, आता तरी शरद पवारांनी आपले घर सांभाळावे अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. शरद पवार आमच्या सर्वांसाठी आदरणीय आहेत. परंतु अजित पवारांनी शरद पवारांचा एकूण मांडलेला आलेख पाहाता त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे पक्षही अडचणीत आला आणि त्यांच्या बाबतची विश्वासार्हताही कमी झाली असे दिसत आहे. शरद पवारांना कुटुंबातही वारंवार खोटे बोलावे लागले. म्हणजे या राजकारणापासून कुटुंबही सुटले नाही असे ते म्हणाले.

        अजित पवारांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र आणि देशाच्या हिताची आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या सर्वांनी त्यांना बाहेर का पडावे लागले, वेगळे का व्हावे लागले यामागची कारणे सांगितली आहे. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्यपरिस्थिती सांगितली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. मी स्वतः पवार कुटुंबातील असून कधी खोटे बोलू शकत नाही, असे अजित पवारांनी नमुद करीत गंभीर वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. महाराष्ट्र त्यावर विश्वास ठेवेल, असे ते म्हणाले. (nagpur) (aamcha vidarbha)

        समरजीत घाडगे नाराज नाही. ते भाजपचे निष्ठावान नेते आहेत. कसाही प्रसंग आला तरीही ते पक्षापासून फारकत घेऊ शकत नाही. उलट शरद पवारांच्या घरातच मनभेद झाले. अजित पवारांनी त्याचे दाखले दिले. शिवसेनेसोबत गेल्यामुळे पवारांचे नुकसानच झाले. आज तर अशी परिस्थिती आली की परिवारही त्यांच्यापासून दूर जात आहे. शरद पवारांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आधी त्यांनी आपले घर सांभाळावे, असे बावनकुळे म्हणाले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top