Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजाराची मदत तात्काळ करा भारत राष्ट्र समितीची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजाराची मदत तात्काळ करा भारत राष्ट्र समितीची मागणी आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि...

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजाराची मदत तात्काळ करा
भारत राष्ट्र समितीची मागणी
आमचा विदर्भ -दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २७ जुलै २०२३) -
        राज्यात अतिवृष्टीमुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली, आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सोबतच अनेक शेतकरी बांधवांचे घर पाण्यामुळे पडले आहे. ह्या दोन्ही अडचणीला माझा शेतकरी बांधव समोर जात आहे.

        शेतकऱ्याला एकरी 10 हजार रुपये, व पडलेल्या घरासाठी कमीत कमी 20 हजार प्रती घर देऊन आलेल्या संकटातून सुटका करावी ही मागणी भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक आनंदराव अंगलवार, (anandrao angalwar) महिला समन्वयक रेशमा ताई चव्हाण, सहसमन्वयक संतोष कुळमेथे,राजुरा तालुका समन्वयक अजय साकीनाला, तालुका सहसमन्वयक महिला मीनाक्षी मून. राजुरा शहर समन्वयक रवीभाऊ पवार, राजूर तालुका सह समन्वयक सुभाष हजारे ह्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र व  कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ह्यांना उप विभागीय अधिकारी ह्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top