Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तालुक्यात विविध ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पाचगावात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आमचा विदर्भ - अनंता गोखरे (उपसंपादक) राजुरा (दि. १ जून २०२३) -           राज्य शासनाच्या महिला व बालविक...
पाचगावात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे (उपसंपादक)
राजुरा (दि. १ जून २०२३) -
          राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी ग्राम पंचायत पाचगाव (ता.राजुरा) तर्फे गावातील दोन कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. (Accomplished women felicitated in Panchagaon)

        ग्राम पंचायत उपसरपंच सौ. उज्वला अकबर आत्राम, पं.स.माजी सदस्या सौ. सुनंदा दे. डोंगे, ग्रा.प. सदस्या सौ.शुभांगी उ. गोनेलवार, ग्रा.प. सदस्या पार्वता वि.तलांडे यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला बचतगटांच्या सदस्य तथा पेसा मोबिलायझर सौ.संजिवनी गणपत कोटनाके, आशा वर्कर सौ.अर्चना र.चल्लावार यांचा सत्कार करण्यात आला.

        राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. उपसरपंच सौ.उज्वला आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला सौ.सुनंदा डोंगे, सौ.शुभांगी गोनेलवार,सौ.पार्वता तलांडे, ग्राम पंचायत सदस्य बापुराव मडावी, ग्रा.प.सदस्य मनोज कुरवटकर, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष लक्ष्मण नुलावार यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सौ.सिंधुबाई कोहपरे, अं.सेविका सौ.तानेबाई पिदुरकर, अं.सेविका सौ.माधुरी पिंपळकर, अं.सेविका सौ.वर्षा सुत्रपवार व महिला उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी ग्राम पंचायत कर्मचारी लक्ष्मण गेडाम, यादव पिदूरकर, रामा आळे यांनी परिश्रम घेतले. संचालन सेविका सौ.सिंधुबाई कोहपरे यांनी तर आभार सेविका सौ.माधुरी पिंपळकर यांनी मानले.

        पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जंयती अहिल्याबाई प्रबोधन मंच मुंबई शाखा-राजुरा द्वारे साजरी करण्यात आली. उपस्थितांनी सर्वप्रथम अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कैलास उराडे तसेच महिला प्रमुख सौ.इंदिरा येवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गोपाळराव बुरांडे, बाळु कापडे, पुंडलिकराव उराडे, भाऊराव पाटील खाडे व मोठ्या संख्येत लोक उपस्थित होते. संचालन सुभाष चिडे तर आभार प्रशांत ढवळे यांनी केले. (Ahilyabai Prabodhan Manch Mumbai Branch-Rajura) (Rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top