Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हिरापुरात जगन्नाथ बाबांचा जयघोष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दर महिन्यातील १६ तारखेला घुगरी काला पंचमुखी देवस्थान हिरापुर येथे करतात शेकडो भाविक गर्दी आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. २२ जु...
दर महिन्यातील १६ तारखेला घुगरी काला
पंचमुखी देवस्थान हिरापुर येथे करतात शेकडो भाविक गर्दी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. २२ जुन २०२३) -
        विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज यांची प्राणप्रतिष्ठा असलेल्या सोळा तारखेला पंचमुखी देवस्थान हिरापुर यांच्या वतीने वामनबाबा पावडे यांच्या उपस्थितीत शेकडो भविकांसोबत दर महिन्याच्या सोळा तारखेला घुगरी काला केला जात आहे. तापमानाचा पारा चाळीसच्या वर असतानाही भाविकांची सदगुरू जगन्नाथ बाबावर असलेली श्रद्धा रखरखत्या उन्हात दिसून येत आहे. (Ghugri Kala on 16th of every month)

        अनाथाचा नाथ असलेले सद्गुरु जगन्नाथ महाराज यांची लीला ही अपरंपार होती. सर्व निसर्गावर त्यांची किमया होती. त्यामुळे आज जगन्नाथ बाबा यांना मानणारे भक्त मोठ्या प्रमाणात गावोगावी दिसून येत आहे. विदेही संत श्री जगन्नाथ महाराजांचे बहुतांश समाजात अनेक भक्तगण आहेत. दर महिन्याची १६ तारीख ही महाराजांच्या आस्थेने भक्तीमय वातावरणात विविध मठामध्ये साजरी होते. या निमित्ताने परिसरात आध्यात्मिकता व एकोपा निर्माण होत असते. यामुळे मनाला शांती व समाधान मिळत असते. वामनबाबा हे या परिसरातील श्रध्दास्थान आहेत. यामुळे हिरापूर येथे दर १६ तारखेला भक्तांची मोठी गर्दी उसळून येत आहे. वामन बाबा यांच्या उपवासाला बावीस महिने पूर्ण झाले असून त्यांचे उपवास वारी अजूनही सुरूच आहे.

        विदर्भ ही संतांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते यात विविध धर्माच्या संस्कृतीचे जतन करून त्या परंपरागत पाळल्या आहे. अनेक देवदेवतांचा वसा विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून चालवीत आहे. कोरपना तालुक्यातील हिरापूर गावात वामन बाबा पावडे यांनी (दि. ६ ऑगस्ट २१) अखंड उपवासाला सुरुवात केली त्या. अखंड उपवासाची (दि.६ जून २२) पूर्ण बावीस महिने पूर्ण झाले असून अजूनही त्यांची उपवासाची वारी सुरू आहे. (Hundreds of devotees throng the Panchmukhi Hanuman Mandir at Hirapur)

        दर महिन्याच्या १६ तारखेला होम हवन, दहीहंडी सह भक्तांसाठी घुगरी काल्याचे आयोजन पंचमुखी नंदिगड सेवा समिती द्वारे करण्यात येत आहे, वामन बाबा यांना मानणारे भाविक तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी होम हवन कुंडातील रक्षा मानसिक, शाररिक व्याधी दूर करीत असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये असल्याने याठिकाणी दूर दूरचे भाविक दर्शनासाठी हिरापूर येथे येत असून वामन बाबाच्या दर्शनामुळे मानसिक समाधान प्राप्त होत असल्याचे भाविक सांगत आहे. (Gadchandur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top