Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्वच्छता अभियानात रामपूर ग्रापं चे उदासीन धोरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेनेने निभावले सामाजिक दायित्व जेसीबीच्या साहाय्याने केला परिसर स्वच्छ आमचा विदर्भ -अनंता गोखरे द्वारे चंद्रपूर (दि. ५ जून २०२३) -       ...
शिवसेनेने निभावले सामाजिक दायित्व
जेसीबीच्या साहाय्याने केला परिसर स्वच्छ
आमचा विदर्भ -अनंता गोखरे द्वारे
चंद्रपूर (दि. ५ जून २०२३) -
        रामपूर येथे शिवसेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आणि कार्य जोमाने सुरु आहे. नुकतेच शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या वाढदिवस निमित्य शेडच्या कामाचे भूमिपूजन पार पाडले असताना दि. ४ जून ला वॉर्ड क्र 3 मधील कचऱ्याच्या विडख्यात असलेल्या परिसराची जेसीबी च्या साहाय्याने स्वच्छता करण्यात आली. (Shiv Sena fulfilled social responsibility) The area was cleaned with the help of JCB

        शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे यांचेकडे या परिसरातील नागरिकांची वारंवार तक्रार येत होती. त्यांनी आपल्या स्व:खर्चातून सदर स्वच्छतेचे काम पुर्ण केले. रमेश झाडे यांच्या या कार्याचे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. (rampur) (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top