Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - माजी आमदार अँड संजय धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खामोना येथे 10 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा ...
खामोना येथे 10 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. 16 मे 2023) -
        ग्रामीण भागातील सर्व मूलभूत सोय सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करत असते त्यामधून गावातील सर्वांगीण विकास घटत असते, खामोना गावाच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी पुर्ण ताकतीशी उभे असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी म्हटले, राजुरा तालुक्यातील मौजा खामोना येथे जनसुविधा निधी अंतर्गत श्रीमती मिराबाई ठक यांचे घरापासून ते उद्धव गिरसावले यांचे घरापर्यंत 10 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन माजी आमदार अँड संजय धोटे (Adv-Sanjay-Dhote) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर (Sudarshan Nimkar) हे उदघाटक म्हणून उपस्थित होते. (Bhoomipujan of the cement road to be constructed at Khamona at a cost of Rs 10 lakhs completed) (Rajura )

        यावेळी पुढे बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की, खामोना हे गाव नॅशनल हायवेशी जोडले असून यापुढेही गावाचा विकास मोठ्या प्रमाणात होणार असून त्या करिता राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, यावेळी माजी आमदार निमकर व ग्रामपंचायत सरपंच हरि झाडे यांनीही मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड संजय धोटे, उदघाटक माजी आमदार सुदर्शन निमकर, ग्रामपंचायत सरपंच हरिदास झाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, भाजपाचे जिल्हा सचिव दिलीप गिरसावले, उपसरपंच शारदा तालांडे, ग्रामपंचायत सदस्य कवडू सातपुते, सौ सोनुबाई ठक, मारोती चन्ने, दिलीप वैद्य, बाबुराव चन्ने, पोलीस पाटील विजय पादे, रामदास गिरसावळे, पुंजाराम ठक, चंदनखेडे गुरुजी आदी उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top