Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: परसोडा चुनखडक खान जमीन अधिग्रहण प्रकरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुभाष धोटेंची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कंपनी व्यवस्थापन सकारात्मक आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २५ ...
आ. सुभाष धोटेंची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कंपनी व्यवस्थापन सकारात्मक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २५ एप्रिल २०२३) -
        कोरपना तालुक्यातील मौजा परसोडा येथील चुनखडक खाणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमीनी अधिग्रहना बाबत तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या या संदर्भातील मागण्यांवर मा. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे बैठक घेऊन चर्चा केली. यात आ. धोटे यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत परसोडा येथे प्रस्तावित चुनखडक खान व्यवस्थापन सकारात्मक असून बैठकीत मे. आरसीसीपीएल प्रायव्हेट लिमिटेड, मुकुटबन (M/s RCCPL Private Limited, Mukutban) चे व्यवस्थापक ए.आर. राठोड यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. (come Subhash Dhote's discussion with District Collector Company management positive on farmers' demands)

        कोरपना तालुक्यातील मौजा परसोडा व परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रती सात/बारा वर कुंटुबातील एका व्यक्तीला कंपनीमध्ये त्यांच्या शैक्षणीक पात्रतेनुसार नौकरी देण्यात यावी, अधिग्रहित शेती परिसरातील स्थानिक भुमिहीन नांकरिकाना कंपनीमध्ये ८० टक्के रोजगार उपलब्ध करावा, कंपनी लगतच्या गावांना दत्तक घेऊन सामुदायिक विकास, मुलभुत सुविधा व इतर विकास कामे कंपनीने करून द्यावीत, कंपनीच्या चुनखडक खाणक्षेत्रात कंपनीच्या कांमामुळे निमार्ण होणाऱ्या शेतपिकाचे नुकसान आणि ब्लास्टींग किंवा बारूद स्फोटामुळे होणारी जिवीत व वित हाणीची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची असावी इत्यादी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. (Mauja Parsoda in Korpana Taluka)

        या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार परदेशी, जिल्हा भूसंपादन अधिकारी सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, सहायक जिल्हा खानिकर्म अधिकारी रोहन ठवरे, कोरपना तहसिलदार डॉ. विनोद डोनगावकर, खान व्यवस्थापक के. आर. राठोड, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, उपसरपंच सतीश गोन्लावार, सतीश कातकर, गणेश मडावी, तमुस अध्यक्ष नेमचंद्र काटकर, मारोती गोडनवार, इसरी गुज्जेवार, मिलिंद बेंडले, गंगाधर मेकलवार, रमेश घंटीवार, अरुण मेघमवार, रमेश मेश्राम, अरुण कंटावार, रामभाऊ कोचाडे, सखाराम तलांडे, सागर कातकर, माजी उपसरपंच धर्मविर कातकर, सुधाकर कुमरे, मंगेश बांदुरकर, गंगारेड्डी कुंटावार, सुधाकर अग्रिकार असे स्थानिक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top