Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्ज वाटप करा - आबिद अली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतमालाला अत्यल्प भावाने शेतकरी अडचणीत आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधि कोरपना (दि. १५ एप्रिल २०२३) -         शेतकऱ्याची अडचण...
शेतमालाला अत्यल्प भावाने शेतकरी अडचणीत
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधि
कोरपना (दि. १५ एप्रिल २०२३) -
        शेतकऱ्याची अडचण लक्षात घेता आगामी हंगामसाठी राष्ट्रीयकृत्व व सहकारी बँकानी पीक कर्ज वाटप कार्यक्रम त्वरित घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली यांनी केली आहे. (korpana) (aamcha vidarbha)

        (Farmers are in trouble due to low price of agricultural products) शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम मार्च एप्रिल पासून संपला आहे. पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी लागलेला आहे. नांगरणी, वखरणी, बियाणे घेणे, शेत मजुरांना मजुरी देण्या आदींसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज येऊन ठेपली आहे. यंदाच्या हंगामात कापसाला अत्यलप भाव मिळाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात अडकला आहे. कसे बसे जुडवा जुडव करून त्यांनी मार्च महिन्यात आपले मागील वर्षीचे पीक कर्ज भरले. त्यामुळे त्याच्या कडे आता दमडी सुद्धा उरली नाही. सोयाबीन, तूर, हरभरा  या शेतमालाला विक्रीत ही शेतकऱ्याची बऱ्याच ठिकाणी आर्थिक पिळवणूक झाली. तसेच अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गान पुढे आर्थिक चंचन जाणवत आहे. तसेच लग्न, बोरवण, कौटुंबिक प्रसंगाचे कार्यक्रम आगामी काळात येऊन ठाकले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे असे स्थिती आहे. बरेच शेतकरी यामुळे चिंता क्रांत झाले आहे. त्यामुळे शासनाने हस्तक्षेप करून बँकांना पीक कर्ज त्वरित देण्यासाठी निर्देश द्यावे व शेतकऱ्याची अडचण दूर सारावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top