Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कन्हालगाव येथे शॉर्टसर्किटमुळे कापसाला आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधि कोरपना (दि. १५ एप्रिल २०२३) -         तालुक्यातील कन्हाळगाव येथील एका घरात साठवलेल्या कापसाल...
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधि
कोरपना (दि. १५ एप्रिल २०२३) -
        तालुक्यातील कन्हाळगाव येथील एका घरात साठवलेल्या कापसाला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना शनिवार दि. १५ ला सकाळी दहा वाजता घडली. (The cotton caught fire due to an electrical short circuit) (korpana)

        प्राप्त माहितीनुसार, कन्हाळगाव येथील रामचंद्र झोलबाजी वासेकार यांचा कापूस वेचणी झाल्यानंतरचा कापूस जुन्या घरात साठवून होता. आज दहा वाजता दरम्यान अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत  तेथील ५ क्विंटल कापूस, दरवाजा, कवेलुचे तीन पत्राचे नुकसान झाले. त्याची अंदाजे किंमत ५८ हजार रुपये वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा महसूल व पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी तलाठी कमलवार, पोलीस उपनिरीक्षक खेकाडे, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top