अंबुजा सीमेंट उपरवाही येथील दोन कामगार पक्षाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २६ एप्रिल २०२३) -
उपरवाही येथील अडाणी सिमेंट वर्क्स (अंबुजा सिमेंट येथे कामावर असताना एका कंत्राटी कामगाराचा मृत्यु झाला. त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व कुटुंबीयातील एकाला नौकरी मिळावी या करीता अंबुजा सीमेंट येथील ठेका कामगारांनी मागणी केली होती. कंपनी प्रशासन, पोलिस निरीक्षक गड़चांदुर, मृतकाचे नातेवाईक आणि उपस्थित अन्य कामगार यांच्या समोरासमोर चर्चा करण्यात आली आणि सर्वांच्या सहमतीने आणिबानी परिस्थितित सात लाख पन्नास हजार रुपये, दोन मुलांना पेंशन व मृतकाच्या मुलास तत्काल नोकरी देण्याचे मान्य करण्यात आले होते. परंतु मराठा कामगर संघटना उपरवाहीच्या नेत्यांनी विजय क्रांति कामगार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यावर कामगारांना अंधारात ठेवून व्यवस्थापनाशी हात मिळवणी केल्यामुळे मृतक कामगाराच्या कुटुंबीयांना फक्त साडेसात लाख रुपयांची मदत मिळाल्याचा आरोप करत कामबंद आंदोलन करून मृतकाच्या परिवाराला 15 लाख रुपयांची मदत आणि एक मुलाला नोकरी देण्याची कबुली मिळवून दिली. (Two labor parties in Ambuja Cement Upravahi accuse each other)
आता विजय क्रांति क़ामगार संघटने ने मराठा कामगर संघटना उपरवाहीच्या पदाधिकाऱ्यांवर मृत कामगाराची आड़ घेऊन राजकीय चमकोगिरीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. (Vijay Kranti Workers Association) (gadchandur)
विजय क्रांति कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे ने सांगितले की दिनांक २४ एप्रिलच्या सकाळी नुकसान भरपाई दाव्याबाबत मृतकाचे दोन भाऊ, पत्नी, मुलगा, माइंस डिपार्टमेंट मधील मृतकाचा भाचा रवि मांडवकर, भाजपा कार्यकर्ता अझिम बेग, युवक कांग्रेसचे शहर प्रमुख रूपेश चुधरी, गुरुनानक ट्रांसपोर्ट चे कर्मचारी आणि विजयक्रान्ति यूनियनचे महासचिव, कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी दरम्यान चर्चा करण्यात आली. बैठकीत उपस्थित पोलिस निरीक्षक गड़चांदुर, मृतकाचे नातेवाईक आणि उपस्थित अन्य कामगार यांच्या समोरासमोर चर्चा करण्यात आली. त्यात जुन्या प्रकरणातील उदाहरण देत १५ लाख आर्थिक मदत व एक नोकरी अशी चर्चा सुरु झाली. पण जुन्या केसेस मध्ये मृत कामगार यांचा सेवा काळ १७-१८ वर्ष होता आणि मृत कामगार यांचा सेवा कार्यकाळ हा दोनच महिन्याचा असल्याने चर्चेत मार्ग निघत नव्हता. पुढे उपस्थितांच्या सहमतीने विचार विनिमय करून आणिबानी परिस्थितित सात लाख पन्नास हजार रुपये, दोन मुलांना पेंशन व मृतकाच्या मुलास तत्काल नोकरी देण्याचे मान्य करण्यात आले. विजयक्रान्तिचे पदाधिकारी यांनी मृतकाचे भाचे व त्याचे विजयक्रान्ति यांनी एक संघटना जी चर्चा स्थळी येऊन बाहेर बाहेरुन परत जात आहे पण चर्चेत सहभाग घेत नाही त्यामुले आपण दुसऱ्या यूनियनला सोबत घेऊन व्यवस्थापना बरोबर दाव्यासाठी चर्चा करू शकता आम्ही माघार घेण्यास तयार आहोत असेही चर्चा त्याठीकाणी झाली पण नातेवाईक यांच्यावर अंत्यविधिचा वाढता दबाब बघता त्यांनी स्पष्ट नकार दिला .
याहुनही पुढे बैठक सुरु असताना तथाकथित असंतुष्ट कामगार नेत्यांना कंपनी प्रशासनाने चर्चेत सहभागी होण्याची तीनदा निमंत्रन दिले, पण त्यांनी चर्चेत सहभाग न घेता, एक सेटलमेंट झाल्यावर आक्षेप घेत विजयक्रान्ति यूनियनचे घोर विरोधी अश्या कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताशी धरून अधिक मदत मिळवण्यासाठी कामबंद आंदोलन करून कंपनीस वेठीस धरून फक्त आपले संपुष्टात आलेले वर्चस्व कायम करण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले. शेवटी कंपनीने दोन्ही कामगार संघटनाचे मान राखत साढ़ेसात-साढ़ेसात लाख असे पंधरा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरविन्यात मान्य केले.
ज्यांच्या दारात ठेकेदारी कामगार उभा झाल्यास हाकलुन लावणारे कामगार नेते आता परत कामगाराकडे आशेने पाहु लागले आहे. यातील अल्ट्राटेक सीमेंट कंपनीतील संधिसाधू नेत्याने आपल्या मुलाचे बनावट कागदपत्र बनवून कंपनीत नोकरी लावली त्यासाठी चाळीस ठेकेदारी कामगारांना स्थाई नोकरीत समाविष्ट करण्याचा कंपनीच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखविन्यात आली. स्वतःचा उदो-उदो करण्यासाठी फोटोग्राफी करून चमकोगिरी साठी धडपड करणारे नेते ह्यांनी स्वतःचा जूना इतिहास बघावा. असा आरोपही विजय क्रांति क़ामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे.
दोन वर्षापूर्वी अल्ट्रा-टेक सीमेंट येथील ठेकेदारी कामगार याचा हार्टअटैक ने मृत्यु झाला. मरणोप्रांत मृतकाच्या मुलाला नोकरी व पंधरा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले होते. मुलाला नोकरी तर मिळाली पण मृतकाची पत्नी हिला अजूनही पंधरा लाख मिळाले नाही. ती विजयक्रान्ति अल्ट्राटेक सीमेंटच्या स्थानिक पदाधिकारी ह्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आजही मदत मागत आहे.
महिनाभरपूर्वी अल्ट्राटेक आवारपुर येथे लोडर भरतीत मोठ्या प्रमाणात हयाच कामगार नेत्याकडुन आपल्या विश्वासु कामगारा मार्फत नोकरी लाऊन देण्यासाठी आर्थिक लूटमार करण्यात आली. त्यातील संशईत एका कमगारांवर आरोप सिद्ध होताच त्याला सेवेतुन बड़तर्फ करण्यात आले. त्याचे तार कुठे जुळले हेही त्यांनी आत्मचिंतन करून पाहावे. असाही आरोप लावण्यात आला आहे.
आपल ठेवाच झाकुन आणि दुसऱ्या पाहायच वाकुन अशी नीति हे स्वयंम घोषित नेते मंळली करीत आहे. मुळात कामगार क्षेत्रात विजयक्रान्तिच्या रूपाने निर्माण झालेली प्रतिस्पर्धा आणि संपुष्ट होत चाललेली लोकप्रियता ही वाचविन्यासाठी मृत कामगार ह्यांचा कसा उपयोग होत आहे हहे बघण्यासारखे आहे अशी माहिती विजयक्रान्ति कामगार संघटनेचे महासचिव बबन आत्राम यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.