Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सामाजिक कार्यकर्ते आनंदराव अंगलवार त्रिवेणी पुरस्काराने सन्मानित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. ९ मार्च २०२३) -         माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेना या संघटना यांचे संयुक...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. ९ मार्च २०२३) -
        माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेना या संघटना यांचे संयुक्त विद्यमाने 5 मार्च ला कर्मविर दादासाहेब उपाख्य मा.सा. कन्नमवार सभागृह जि.प.चंद्रपुर येथे सामाजीक,शैक्षणिक, पत्रकारीता तसेच राजकिय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे महाराष्ट्रातून विविध मान्यवरांचे सत्कार करणयात आले. कार्यकमाचे उदघाटन रविंद्र शिंदे माजी अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा सिडिसीसी बँक चंद्रपुर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ. अविनाश सकुंडे सदस्य अल्पसंख्याक आयोग भारत सरकार दिल्ली, प्रमुख पाहूणे म्हणून आमदार किशोर जोरगेवार, मराठी सिने अभिनेते विजयकुमार खंडारे, राष्ट्रीय महिला आयोग मुंबई अध्यक्षा सौ.जयश्रीताई सावर्डेकर, मुख्य आयोजक तुळशीराम जांभुळकर, डाॅ. कैलास पठारे राष्ट्रीय अध्यक्ष पोलिस मित्र पुणे इत्यादींचे उपस्थितीत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. (Anandrao Angalwar) (Triveni Award)

        या प्रसंगी चंद्रपुर जिल्ह्यातील  शिक्षण व शिक्षक संघटना व विविध सामाजिक संघटना मध्ये सहभाग सामाजिक चळवळीत नेहमी अग्रणी  राहणारे भारतीय जनसेवा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय घुमंतू जनजाती वेलफेअर संघ दिल्ली. प्रांतीय कार्याध्यक्ष विदर्भ बेलदार व तत्सम समाज, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष विदर्भ शिक्षक संघ नागपूर. इत्यादी पदावरून सामाजिक चळवळी नेहमी अग्रणी राहणारे आनंदराव वाय. अंगलवार यांचे शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह प्रदान करून मान्यवरांचे उपस्थितीत गौरविण्यात आले. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगारंग कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी माहीती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी तसेच अमोल वर्मासह विविध कार्यकर्ते परिश्रम घेतले. संचालन प्रलय मशाखेत्री, श्रृती तपन सरकार यांनी तर किशोर मुटे यांनी आभार प्रदर्शन केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top