Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा वर्ष प्रतिपदा उत्सव संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. २७ मार्च २०२३) -         राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) राजु...
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. २७ मार्च २०२३) -
        राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) राजुरा नगराचा वर्ष प्रतिपदा उत्सव नुकताच संपन्न झाला. मुख्य संघस्थान गढी वॉर्ड राजुरा येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात तालुका संघचालक राजेंद्र येनुगवार यांनी तालुका आणि नगराच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. या उत्सवाला वक्ता म्हणून बाळकृष्ण गोंदे उर्फ बाळूमामा विभाग संयोजक धर्म जागरण बल्लारपूर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रमुख वक्ते यांनी संघ कार्याचे महत्त्व आणि हिंदू समाज एकत्र येण्यासाठी आणि संघकार्याचे महत्त्व पाटवून दिले. शैलेश पर्वते जिल्हा कार्यवाह रा. स्व.संघ चंद्रपूर आणि नगर कार्यवाह महेश समर्थ यांची मंचावर उपस्थिती होती. उत्सवपूर्वी घोष वादन पूर्णगणवेशात नगरातील मुख्य मार्गावरून पथसंचलन झाले. उत्सवाला पूर्ण गणवेशात स्वयंसेवक बंधू उपस्थित होते. (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top