Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गारपिटीने मिरची पिकाचे नुकसान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नुकसाभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर तालुका प्रतिनिधी राजुरा (दि २६ मार्च २०२३) -         गेल्या तीन चार दिवस...
नुकसाभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर तालुका प्रतिनिधी
राजुरा (दि २६ मार्च २०२३) -
        गेल्या तीन चार दिवसापासून पावसाने चांगलाच कहर केला असून बळीराजा मेटाकुटीस आला आहे. शेतातील उभ्या पिकाचे पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. आज दुपारी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने धानोरा, कविटपेठ शेतशिवरातील मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. (rajura)

        वर्धा नदीला पावसाळ्यात आलेल्या पाच पुरामुळे खरीप पिके गेली. यामुळे परिसरातील शेतकरी अगोदरच पुरता हतबल झाला आहे. पावसाळा गेल्यानंतर परत कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेत पेरले. यात मिरची, गहू, हरभरा, ज्वारी हि पिके घेतली. बऱ्याच शेतकऱ्यांची मिरची शेतात आहे. मिरची पिकाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार होता. मात्र अवकाळी पाऊस, वारा व झालेल्या गारपिटीने मिरचीचे उभे पीक वाकून गेले असून झाडाची मिरची पूर्ण खाली गळाली. यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्याने संकट उभे झाले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा वर निसर्ग कोपला आहे. अशा परिस्थितीत शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली जात आहे. (Farmers' demand for compensation)
"पुरामुळे खरीप पिके हातून गेली. त्यानंतर कर्ज काढून मिरचीचे पीक घेतले. मात्र वारा, पाऊस व गारपिटीने मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले असून पुन्हा समोर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे."
- सुनिल बोबाटे, शेतकरी कविटपेठ

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top