Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रीय नर्सिंग स्कूल येथे नवपरिचारिकांचा शपथविधी संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - (दीपक शर्मा) राजुरा (दि. २६ मार्च २०२३) -         राष्ट्रीय नर्सिंग स्कूल बामणवाडा येथे नवपरिचारिकांचा शपथविधी (Oath ceremony ...
आमचा विदर्भ - (दीपक शर्मा)
राजुरा (दि. २६ मार्च २०२३) -
        राष्ट्रीय नर्सिंग स्कूल बामणवाडा येथे नवपरिचारिकांचा शपथविधी (Oath ceremony of new nurses) कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात समानता बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक महमूद मुसा, संचालक नदीम, प्रमुख अतिथी म्हणून (Primary Health Center Rajura) प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरा येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. कुळमेथे, कोरपना येथील आरोग्य अधिकारी डॉ. गजेंद्र अहिरकर, राष्ट्रीय आयटीआय तसेच राष्ट्रीय पब्लिक स्कूलचे (National ITI and National Public School) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अश्याप्रकारे राष्ट्रीय नर्सिंग स्कूल येथे दोन दिवसांचा नवपरिचारिकांच्या शपथविधी व स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top