Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदार सुभाष धोटे यांनी दिली उपजिल्हा रुग्णालयाला भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Time Management! आमदार सुभाष धोटे यांनी दिली उपजिल्हा रुग्णालयाला भेट धोटेंनी घेतली सिंधीच्या "त्या" जखमींची भेट मोफत मोतीबिंदू शस...
Time Management!
आमदार सुभाष धोटे यांनी दिली उपजिल्हा रुग्णालयाला भेट
धोटेंनी घेतली सिंधीच्या "त्या" जखमींची भेट
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेला दाखवली हिरवी झंडी
वैद्यकीय अधिकारी डॉ. कुळमेथे याना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमचा विदर्भ - (दीपक शर्मा)
राजुरा (दि. २७ मार्च २०२३) -
        टाइम मॅनेजमेंट कसे करावे याची प्रचिती सर्वसामान्यांना आज आमदार आमदार सुभाष धोटेंच्या (subhash dhote) उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्या प्रसंगी आली. आमदार सुभाष धोटे यांनी आज उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे शेतशिवरात वीज पडून ७ व्यक्ती जखमी झाले होते. सर्व जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात येऊन त्यांचेवर उपचार करण्यात येत आहेत. सध्या सर्वांची प्रकृती ठीक आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे आमदार सुभाष धोटे हे मुंबईत असल्याने ते तेव्हा त्यांना भेटू शकत नव्हते त्यामुळे आज प्रत्यक्षात रुग्णांची भेट घेऊन भरती आलेल्या सर्व रुग्णांच्या तब्येतीची विचारपुस करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. (A green light shown to an ambulance for free cataract surgery) (Upazila Hospital Rajura) 
        (National Blindness Control Programmes) राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समता फाऊंडेशन मुंबई, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रातील २२ रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract surgery) करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे जाण्याऱ्या रुग्णवाहिकेला हिरवी झंडी दाखवून रवाना केले. तसेच आज उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहूजी कुलमेथे यांचा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. आमदार सुभाष धोटे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू कुळमेथे, जेष्ठ नेते, कृ.उ.बा.स. माजी सभापती आबाजी ढुमणे, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, सरपंच विहिरगाव ॲड. रामभाऊ देवईकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, राजकुमार दामेलवार, भास्कर मोरे, डॉ. शंकर बुऱ्हाण यासह अनेक मान्यवर, अन्य डॉक्टर, परिचारिका व नागरीक उपस्थित होते. (Time Management!)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top