Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जगाला सुंदर करण्यात कर्तुत्वान महिला शक्तींचे अनमोल योगदान - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जागतिक महिला दिनानिमित्त पंस राजुराच्या वतीने विविध वैयक्तीक लाभार्थीना साहित्यांचे वितरण आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुर...
जागतिक महिला दिनानिमित्त पंस राजुराच्या वतीने विविध वैयक्तीक लाभार्थीना साहित्यांचे वितरण
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. ८ मार्च २०२३) -
        पंचायत समिती राजुराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगीआमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना २०% सेस फंड समाज कल्याण विभाग अंतर्गत शिलाई मशीन, आटा चक्की उभारण्यासाठी धनादेश, ५% दिव्यांग वैयक्तिक लाभ योजने अंतर्गत झेरॉक्स मशीन खरेदीसाठी धनादेश, मानव विकास मिशन अंतर्गत जिप शाळेच्या मुलींना मोफत सायकल अशा विविध वैयक्तीक लाभार्थीना विविध उपक्रमांतर्गत साहित्यांचे वितरण करण्यात आले. तर पंस राजुरा अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. तसेच किशोरवयीन मुली, महिला जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात आले. (subhash dhote) (Jagtik Mahila Din)

        या प्रसंगी आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात आमदार धोटे यांनी सांगितले की, जगाला सुंदर करण्यात कर्तुत्वान महिला शक्तींचे अनमोल योगदान आहे. खऱ्या अर्थाने महिलांमुळेच घराला घरपण येते. अनेक आव्हानांना सामोरे जात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. येणाऱ्या काळात आपले हे सामर्थ्य ओळखून आनखी प्रगती करण्यासाठी महिलांनी शिक्षण, तंत्रज्ञान, व्यावसायिक कौशल्य, स्पर्धा परीक्षा आणि सर्वांगीण विकासाची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले.

        या प्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उद्घाटक आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, माजी सभापती कुंदा जेणेकर, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, गटशिक्षणाधिकारी दिलीप गौरकार, सहाय्यक गटविकास अधिकारी धर्मपाल कराडे, प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, विस्तार अधिकारी आनंद नेवारे, रवी रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गटसाधन व्यक्ती मुसा शेख, करूणा गावंडे यांनी केले प्रास्ताविक गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी  अमित मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.

#Distribution of materials to various individual beneficiaries on behalf of Panchayat Samiti Rajura on International Women's Day

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top