Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सिमेंट कंपनी ने प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अन्यथा... मनसे स्टाईलने उत्तर देणार : जिल्हा प्रमुख मनदीप रोडे आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. २६ मार्च २०२३) ...
अन्यथा... मनसे स्टाईलने उत्तर देणार : जिल्हा प्रमुख मनदीप रोडे
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २६ मार्च २०२३) -
        गडचांदूर शहरात असलेल्या देशातील नामांकित् असलेली अल्ट्राटेक सिमेंटच्या प्रदूषण मुळे येथील व परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. धुळीमुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Heavy crop damage due to dust) होत आहेत. अनेकांना विविध प्रकारच्या आजाराने ग्रासले आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन कंपनी वर कठोर कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह समोर 24 मार्च पासून मनसे तालुका प्रमुख सुरेश कांबळे यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहेत. (Maharashtra Navnirman Sena) (gadchandur) (Ultratech Cement)

        आज 26 मार्च ला जिल्हा प्रमुख मनदीप रोडे (Mandeep Rode) यांनी आंदोलन स्थळी भेट दिली सिमेंट कंपनीच्या प्रदूषण मुळे संपूर्ण शहरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासन ने याबाबत पुढाकार घेऊन कंपनी ला प्रदूषण रोखण्यासाठी शहरात विविध ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित करण्यास भाग पाडावे. दिल्लीत ज्या प्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे, त्याच पाश्वभूमिवर गडचांदूर येथे सुद्धा यंत्रणा कंपनीने उभारावी अशी मागणी मनदीप रोडे यांनी पत्रपरिषदेत (press conferences) केली आहे. कंपनीने याबाबत उपाययोजना केली नाही तर मनसे स्टाईल ने उत्तर देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. शहरातील विविध राजकीय पक्षांनी, सामाजिक संस्थानी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंती सुद्धा यावेळी केली. याप्रसंगी उपजिल्हा सचिव प्रकाश बोरकर, तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश भारती, गडचांदूर शहर उपाध्यक्ष सिद्धेश्वर केंद्रे, राजू खटोड, बंडू वैरागडे, पुरुषोत्तम महाराज, शिवसेनेचे सुधाकर ताजने, भाजपचे गोपालभाऊ मालपाणी, रवी शेंडे, राकेश ठेवले, मदनी पटेल व इतर उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top