Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बळीराजाला बळ देणारा अर्थसंकल्प - भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अर्थसंकल्प दृष्टिक्षेप २०२३ आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी चंद्रपूर (दि. ९ मार्च २०२३) -         छत्रपती शिवाजी महाराजांच्या श...
अर्थसंकल्प दृष्टिक्षेप २०२३
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर (दि. ९ मार्च २०२३) -
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष या महोत्सवासाठी शासनाने 350 कोटी रुपयांची तरतूद केली तसेच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी व्यवस्थित नियोजन केले करण्यात आले असून सदर अर्थसंकल्प बळीराजाला बळ देणारा आहे अशी प्रतिक्रिया राज्याच्या अर्थसंकल्पावर भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी दिली. 

अर्थसंकल्प दृष्टिक्षेप २०२३
        राज्यशासन आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यान तर शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन करणार आहे. यामुळे महाराष्ट्राची मान उंचावणार आहे. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येयावर आधारित असून शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास हे ध्येय या अर्थसंकल्पातुन स्पष्ट होत आहे.
  • शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा सन्मान निधी
  • शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा पाच लाख
  • अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
  • महिलांना अर्ध्या तिकिटांत एसटीचा प्रवास
  • राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन
  • केंद्राप्रमाणे राज्य सरकारही देणार शेतकरी सन्मान निधी
  • शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपये मिळणार, केवळ 1 रुपयात पीक विमा
  • महिलांना आता मासिक 25,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त. यापूर्वी ही मर्यादा मासिक 10,000 रुपये होती, ती आता 25,000 रुपये
  • दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसायकरातून सुटका. हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पाऊल
  • वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर. ही नवीन अभय योजना 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत. दि. 1 मे 2023 रोजी प्रलंबित थकबाकीसाठी योजना लागू
  • कोणत्याही वर्षासाठी, व्यापार्‍याची थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ, 1 लाख लहान व्यापार्‍यांना लाभ

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top