Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गावकऱ्यांनी केला लाईनमनचा सपत्नीक सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कर्तव्यदक्ष कार्यप्रणाली मुळे लाईनमनने जिंकली गावकरी व शेतकऱ्यांची मने आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. १८ जानेवारी ...
कर्तव्यदक्ष कार्यप्रणाली मुळे लाईनमनने जिंकली गावकरी व शेतकऱ्यांची मने
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. १८ जानेवारी २०२३) -
        सरकारी कर्मचारी आपल्या कार्यकर्तुत्वाने लोकांची मने जिंकतात व ते नेहमी लोकांच्या स्मरणात राहतात. अश्याच एका लाईनमनचा सपत्नीक गावकऱ्यांनी सत्कार केला. दि. १७ जानेवारी २०२३ रोजी खामोना येथील गावकऱ्यांनी लाईनमन विजेंद्र कोटनाके यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता यात लाईनमन विजेंद्र कोटनाके यांचा गावकऱ्यांनी सपत्नीक सत्कार केला.

        जुन २०१९ रोजी खामोना, अहेरी, पाचगाव या परिक्षेत्रासाठी तंत्रज्ञ म्हणुन लाईनमन विजेंद्र कोटनाके यांची नियुक्ती झाली होती. दि. ५ जुन २०२३रोजी त्यांची पदोन्नती होऊन (वरिष्ठ तंत्रज्ञ) बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावासाठी नियुक्ती झाली. पण या कालावधीत त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कार्यप्रणालीमुळे गावातील गावकरी, शेतकरी यांची मने जिंकली. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, सन्मानाने बोलण्याची शैली ही मन ओढून घेणारी होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते आपल्या कर्तव्यात एकनिष्ठ होते. त्यांचा "भाऊ थोड्या वेळात येतो" हा शब्द गावकऱ्यांच्या मनात ठाम विश्वास व्यक्त करत असे. निरोप कार्यक्रमात गावकऱ्यांकडून विजेंद्र कोटनाके याना स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ देत सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील रामकिशन पिंपळशेंडे, विठोबा बुटले, श्यामराव चन्ने, कवडू झाडे, सुरेश बुटले, रामकृष्ण बुटले. वासुदेव मोरे, बंडू ईसनकर, बापुजी बुटले, कमलाकर डोंगे, श्यामराव विधाते, बाळू भगत, मारोती इसनकर, संतोष चन्ने, संजय लोहबडे, अनिल भगत, गजानन ढूमणे. सौ. सरिता मोरे, सौ.कविता ढूमणे. सौ. विजयश्री जेऊरकर, सौ. प्रिया विधाते, सौ.सोनु पावडे, सौ कांता चन्ने, सौ. मंदा ढूमणे, सौ नलुबाई बुटले, सौ. संगीता इसनकर, सौ सरिता मोरे, सौ.सुलभा लोणारे, सौ.चित्रा चन्ने, सौ.योगीता इसनकर व गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप बुटले तर आभार मारोती चन्ने यांनी केले. नंदूकुमार बुटले, मनोज बुटले, समाधान विधाते, संजय बुटले, अमोल चन्ने यांचे विषेश सहकार्य लाभले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top