Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बछड्यांसह वाघिणीचे दर्शन - तासभर वाहतूक खोळंबली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सायगाटा मार्गावर दोन्ही बाजूला लागली वाहनांची रीघ आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स ब्रम्हपुरी (दि. ६ जानेवारी २०२३)         सायगाटा जंगल परिसर...
सायगाटा मार्गावर दोन्ही बाजूला लागली वाहनांची रीघ
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
ब्रम्हपुरी (दि. ६ जानेवारी २०२३)
        सायगाटा जंगल परिसरात वाघिणीने बछड्यांना जन्म दिला आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास या वाघिणीचे बछड्यांसह रस्ता पार करताना अनेकांना दर्शन झाले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांची रीघ लागली होती. त्यामुळे तब्बल अर्धा-पाऊण तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वनविभाग व पोलिस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. (A tigress gave birth to a calf in the Saigata forest area) (Bramhapuri)

        ब्रम्हपुरीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरील सायागाटा परिसर जंगल व्याप्त आहे. याच परिसरात एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला होता. तेव्हापासून मारुती मंदिराकडे जाणारा रस्ता कठडे लावून बंद करण्यात आला. या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर (Sighting) असतो. सध्या या परिसरात अस्वल असल्याची माहिती आहे. मात्र, मंगळवारी वाघीण बछड्यांसह रस्ता पार करताना दिसून आल्याने परीसरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाला माहिती कळताच रस्त्यावर गस्त वाढविण्यात आली. कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून पोलिस विभागाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी तब्बल तासभर वाहतूक खोळंबली असल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top