आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. २० डिसेंबर २०२२) -
दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी गोंडपिपरी-राजुरा चालणाऱ्या बसममध्ये चालकाने मद्यधुंद होत चालवून विदयार्थ्याला मारहाण प्रकरणी मारहाण करणाऱ्या चालकाची ताबडतोब बदली (स्थलांतर) करून निलंबीत करण्याबाबतचे निवेदन विद्यार्थ्यांनी वाहतूक निरीक्षकाला दिले.
दि. १६ डिसेंबर ला सायंकाळी अंदाजे ४.३० वाजता गोंडपिपरी-राजुरा या बसने रोजच्या प्रमाणे प्रवासी व विद्यार्थ्यांना घेत निघाली.
या बस ने गोंडपिपरी वरून विद्यार्थी शाळेतून घरी जात होते. बस चालक नियमबाहय वेगाने अनियंत्रीत बस चालवित होता, वारंवार ब्रेक मारत होता, हे सर्व बघुन बसमधील सर्व विदयार्थी व प्रवासी भांबावून गेले होते. प्रवाश्यामधूनच पेशाने ड्रॉयव्हर असलेले प्रवासी विलास सिडाम यांनी चालकाला बस हळु चालवा नियंत्रणापलीकडे जाण्याची शक्यता आहे, प्रवासी घाबरलेले आहे, अपघात होवू शकते अशी विनंती केली. मात्र चालकाने अपशब्दांचा उपयोग करत होता, हे प्रकरण बघुन बसमधील विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमधून व्हिडीओ बनविण्याचा प्रयत्न केला. हे बघताच सदर चालक आपली चुक उघड पडेल म्हणुन विदयार्थ्यांचा मोबाईल हिसकावून व्हिडीओ बनविणाऱ्या धनराज कुकडकार या विदयार्थ्याला मारहाण केली. यामध्ये सदर विदयार्थ्याचा ओठाला दुखापत झाली नंतर विद्यार्थी व प्रवाश्यांची धाबा पोलीस स्टेशन येथे तकार देण्याकरीता गेले असता तेथील पोलिसांनी समजावून सांगून तुम्ही येथे तक्रार करण्यापेक्षा बस आगारात तक्रार देण्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी राजुरा बस स्थानकात वाहतूक निरीक्षकांना सदर चालकाची ताबडतोब बदली करून नंतर निलंबीत करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. निवेदन देतांना धनराज कुकडकार, गौरव मोहुर्ले, रजत शेख, अमीत मोहुर्ले, साहील शेख, निखिल कुकुडकार, शिवम कंदीकुलवार, ओंकार वाढई, चेतन चटारे, ओंकार वाढई, शिवानी इजमानकार, धनश्री वाकुडकर, पावनी धुडसे, माही झाडे, माही काळे व इतर विद्यार्थी व प्रवासी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.