आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २० डिसेंबर २०२२) -
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच लोकनेते, माजी आमदार स्व. प्रभाकरराव मामूलकर यांच्या जयंती निमित्त राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयात दि १९ डिसेंबर रोजी आयोजित शेतकरी मेळावा, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे विधिवत उदघाटन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकारचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे शुभहस्ते पार पडले. यावेळी अहीर यांनी आपल्या संबोधनात लोकसेवक मामूलकर साहेब यांच्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कामगार नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ऍड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, सुधाकर कुंदोजवार, अध्यक्ष, आ.शि.प्र.मं., श्रीमती सुमनताई मामूलकर, खुशाल बोन्डे, राजू घरोटे, दत्तात्रय येगीनवार, जेष्ठ संचालक, श्रीधरराव गोडे उपाध्यक्ष, आ.शि.प्र.मं., अँड. अरुण धोटे, अरुण निमजे, माजी सभापती, पांडुरंग जाधव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन जुमनाके, नगरपरिषद जीवती माजी अध्यक्ष, गजाननराव गावंडे, आबिद अली, आबाजी ढुमणे, अविनाश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. (prabhakarrao mamulkar jayanti) (shivaji collage rajura) (avinash jadhav) (naresh puglia)
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हंसराज अहीर यांचे हृदय स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद चलाख यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.