राजुरा -
दि. १३ /१२/२०२२ रोजी मौजा नवेगाव व ग्रा.प. भेंडाळा, ता.राजुरा येथे अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६. नियम २००८ व सुधारित नियम, २०१२ नुसार कलम ५ आणि कलम ३(१)(झ) नुसार अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वन निवासी यांना "निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिकरित्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वन स्त्रोतांचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्क" प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन निर्णय ६ जुलै २०१७ च्या अनुषंगाने सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीला अनुसूचित जमातीचे वन निवासी व इतर पारंपारिक वन निवासी यांच्या फायद्यासाठी अश्या सामूहिक वन संपत्तीचे निरंतर व समसमान व्यवस्थापन, संवर्धन, व्यवस्थापन करण्यासाठी वन विभागाच्या सूक्ष्म योजना किंवा चालू योजना , व्यवस्थापन योजना बरोबर फेरबदलानिशी एकत्रीकरण करण्याचे अधिकार प्रदान केलेले आहे.त्याच संदर्भाने या बैठकीत व्यवस्थापन आराखड्या विषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते संतोष सलाम व अमोल कुकडे ,जगदिश डोळसकर, नीतिन ठाकरे, ( संशोधन अधिकारी),टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई हे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.