राजुरा (दि. २३/११/२०२२) -
भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने वरोरा येथे नुकत्याच पार पडलेला कामगार मेळाव्या (kamgar melava) प्रसंगी चंद्रपूर जिल्हातील कामगार मोर्चाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राजुरा तालुक्यातील कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न करणारे राजुरातील महादेव गोपाळू तपासे (mahadev tapase) यांची भाजपा कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री मा.ना.सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री मा.हंसराज अहिर (hansraj ahir) यांचे सुचनेप्रमाणे तसेच कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश ताटे, भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजय दुबे, भाजपा कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष उमेश बोढेकर यांच्या प्रमुख उपस्थिती ही नियुक्ती करण्यात आली. (bhartiya janata party kamgar morcha) (bhajapa kamgar morcha jilha upadhyksha)
नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे यांना नियुक्ती पत्र देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या नियुक्ती बद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, महामंत्री प्रशांत घरोटे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, कृष्णा कुंभाला, रावला रामस्वामी, भाऊराव चंदनखेडे, संजय जयपूरकर, सज्जाद अल्ली, कुमार रावला तसेच ईतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.