Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सास्ती-राजुरा रस्त्याची समस्या सुटणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंनी दिल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी राजुरा - सास्ती - राजुरा...
आमदार सुभाष धोटेंनी दिल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
सास्ती - राजुरा रस्त्याचे काम रखडल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे आणि दिवस रात्रीच्या अवजड वाहतूकीमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन लागत आहे. अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी या रस्त्यासाठी अनेकदा आंदोलने केली. तसेच आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आणि संबंधित विभागाकडे काम पुर्ण करण्यासाठी मागण्या केल्या. लोकभावना लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी विश्रामगृह राजुरा येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 
सास्ती-राजुरा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, रस्त्याचे काम अधिक मजबूत व्हावे, दिवसभर होणारी अवजड वाहतूक कमी करून रात्रपाळीत करावी, वेकोली कर्मचारी कामावर जाण्या येण्याच्या वेळी, शाळा, महाविद्यालय भरण्या सुटण्याच्या वेळेस अवजड वाहतूक सौम्य स्वरूपात सुरू ठेवणे, सास्ती कार्नरवर ट्राफिक पोलीस नेमणे अशा अनेक सुचना आमदार धोटे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होण्याचा आणि रस्त्याशी संबंधित अन्य समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
या प्रसंगी बैठकीला  आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, तहसीलदार हरीश गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, सूर्जागड माईंनचे प्रोजेक्ट मॅनेजर एल साईकुमार, सा.बा. विभागाचे उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, अनंतराव एकडे, धोपटालाचे माजी सरपंच राजाराम येल्ला, राजु पिंपळकर, सास्तीचे संतोष शेंडे, रामपूरचे जगदीश बुटले, कोमल फुसाटे, ब्रिजेस जंगितवार, प्रभाकर बघेल यासह सास्ती, धोपटाळा, रामपूर चे नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top