Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मुख्याधिकारी व आरोग्य विभाग प्रमुखांना निलंबित करा - अरविंद डोहे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
घनकचरा व्यवस्थापन तसेच ओपन ग्रीन जिमच्या कामात भ्रष्ट्राचाराचा आरोप PF/EPF ची रक्कम न भरता मजुरांची पिळवणूक करण्याचा आरोप धनराजसिंह शेखावत -...
घनकचरा व्यवस्थापन तसेच ओपन ग्रीन जिमच्या कामात भ्रष्ट्राचाराचा आरोप
PF/EPF ची रक्कम न भरता मजुरांची पिळवणूक करण्याचा आरोप
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झेलत असलेल्या गड़चांदूर येथिल नप कर्मचाऱ्यांवर एकानंतर एक आरोप लागत असल्याने येथील कर्मचाऱ्यावर प्रशासनाचे वचक आहे की नाही असा प्रश्न गडचांदुर येथील नागरिकांना पडला आहे. भाजप चे नगरसेवक अरविंद डोहे यांनी विषय कामात हयगय, पक्षपात, कर्तव्यास कसूर करणारे आणि घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात आणि ओपन ग्रीन जिमच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार करणाऱ्या आरोग्य विभाग प्रमुख व तत्कालीन मुख्यधिकारी यांना निलंबित करण्या ची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सविस्तर या प्रमाणे की, गडचांदुर नगर परिषद कडून नुकतेच नवीन सन २०२२ मध्ये घनकचरा व्यवस्थापणाच्या कामाचे १ कोटी रुपयाचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली. सदर काम URBAN ENVIRO West Management Pvt. Ltd यांना १ एप्रिल २०२२ पासून देण्यात आले. सदर काम अंदाजपत्रका नुसार मनुष्यबळ व घंटागाड्या न लावता अंदाजपत्रका नुसार नाममात्र बिल कपात करून ठेकेदराचे बिल काढून मोठा भ्रष्ट्राचार केलेला आहे. कमी मनुष्य बळ, कमी गाड़या लावल्याने शहरातील प्रत्येक घरापर्यंत दररोज गाडया जात नसल्याने कचरा उचलला जात नाही, सरकारी शौचालयाची योग्य साफसफाई होत नाही, ओला कचरा सुखा कचरा वेगवेगळ्या केल्या जात नाही, कर्मचाऱ्याचे विलगीकरण करण्यात येत नाही, प्लास्टिकचे नियोजन न करता जाळल्या जातात व प्रदूषण केल्या जात आहे. मात्र अंदाजपत्रका नुसार नाममात्र बिल कपात करून ठेकेदाराला पूर्ण बिल देवून मोठा भ्रष्ट्राचार होत असल्याची माहिती नगराधक्ष तथा आरोग्य सभापतीना अनेक नगरसेवक आणि नागरिकांनी दिली होती.
आरोग्य सभापती यांनी दिनांक २५/०९/२०२२ रोजी पहाटे ५.३० वा अचानक प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले. त्या ठिकाणी केवळ १६ मजूर व ४ घंटा गाडी होत्या व मौक्यावर उपस्थित नप चे सुपवाइजर व ठेकेदार यांचे सुपवाइजर यांना विचारले असता बाकी घंटा गाडी नादुरुस्त आहे व मजूर आलेच नाही आणि रोज १० ते १५ मजूर अनुपस्थित असल्याची धक्कादायक माहिती दिली. उपस्थित मजुरांना सभापती महोदयांनी वेतन विचारले असता त्यांना केवळ ६ से ८ हजार वेतन देत आहे व PF/ EPF सुध्दा बरोबर भरत नसल्याची माहिती मिळाली. असे असताना सदर विभाग प्रमुख आपल्या मर्जीने जास्तीची एमबी तयार करून संगनमताने मुख्याधिकारी व नगराधक्ष यांचे कडून जास्तीचे बील मंजूर करून घेतल्या जात आहे. तसेच अंदाजपत्रकात नुसार नगर परिषद कडून ठेकेदाराला २२०००/- रुपये प्रति महिना जात असून ठेकेदार मजुराला केवळ प्रतीमाह ६ ते ८ हजार देवून त्यांची पिळवणूक करून त्यांचे PF / EPF ची रक्कम बरोबर न भरल्याने त्यांची व शासनाची फसवणूक करीत असल्याचे मोठे आरोप अरविंद डोहे यांनी लावले आहे.
आरोग्य विभाग प्रमुख यांचे कडे शहरातील ओपन स्पेस वर झाडे लावण्याचे काम आहे. वारंवार सांगूनही झाडे पावसाळा संपत आला तरी झाडे लावण्यात दिरंगाई करीत आहे. पाण्याच्या टाकीच्या कामात फार मोठी दिरंगाई करीत आहे. अग्निशमन गाडी शेडच्या बांधकामात विलंब करीत आहे व गाडी उघडयावर असल्याने खराब होऊन नप ची नुकसान होत आहे. वारंवार सूचना करूनही ते आपल्या कर्तव्यास कसूर करीत आहे.  विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डातील कामांना मुद्दाम विलंब करून पक्षपात करीत असल्याचा आरोपही डोहे यांनी लावला आहे. या निवेदनाची रीतसर चौकशी करून निलंबनाची कारवाई करून सदर घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारा विरुद्ध पोलीस कारवाई करण्यात यावी अशी मागणी अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकारीकडे केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top