Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिवती तालुक्यात वीज पडून दोन महिलांचा जागीच मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर - जिवती तालुक्यातील पाटण/ चिखली परिसरात बुधवारी दि.२८ सप्टेंबरला सायंकाळी वीज पडल्याने दोन...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
जिवती तालुक्यातील पाटण/ चिखली परिसरात बुधवारी दि.२८ सप्टेंबरला सायंकाळी वीज पडल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहे.
शेतीचा काम करून सायंकाळी घरी परत येत असताना विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला. त्यात दोन महिलांचा अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतकांत चिखली येथील रहिवासी सौ. वंदना चंदू कोटनाके (३५) आणि सौ. भारुला अनिल कोरांगे (३२) यांचा जागीच  मृत्यू झाला आणि कु. सुरेखा जागेराव वेडमे व अन्य दोन जखमी झाल्या आहेत. शेतातून परत येत असताना एकूण पाच महिला व मुली सोबत असल्याची माहिती मिळाली आहे. तीन जखमींवर पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top