Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यातील खुल्या कोळसा खाणीत भरणा करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्ह्यातील खुल्या कोळसा खाणीत भरणा करा सुरेश मल्हारी पाईकराव यांची मागणी डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - आई जिजाऊ अ हेल्पी...
जिल्ह्यातील खुल्या कोळसा खाणीत भरणा करा
सुरेश मल्हारी पाईकराव यांची मागणी
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
आई जिजाऊ अ हेल्पींग हँड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व वेकोलि सीएमडी नागपूर, वेकोली महाप्रबंधक तडाली यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे घुग्घुस ते वणी नॉर्थ, वणी एरिया व चंद्रपूर जिल्ह्य़ातील बंद असलेल्या ओपनकास्ट ओपन माईनतील खाणीत मातीचा भरणा करावा अशी मागणी करण्यात आली. वेकोलि द्वारे झाडे तोडून ओपन खुली खाण करतात त्यामुळे ऑक्सिजनची सुद्धा घाट होते, सोबतच हरित पर्यावरण नसल्याने हवा सुध्दा शुध्द वाहत नसल्याचे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. वेकोलि द्वारे खुल्या खाणीतून कोळसा काढल्यानंतर तशीच खुली ठेवून देण्यात येतात. अशीच खुली खान सोडल्याने भविष्यात गुन्हेगारी सुध्दा वाढू शकते. त्यामुळे अश्या खाणी लवकरात लवकर भरणा करून लोकांना वापरासाठी देण्यात याव्या अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सुरेश मल्हारी पाईकराव, ललित गाताडे, अशोक आसमपल्लिवार, अशोक भगत, जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, शरद पाईकराव, जय कामतवार, कुणाल कामतवार, आकर्षण गाताडे, सिद्धांत गुडदे, अंकित नालमवार, संस्थापक कृष्णा पाईकराव आई जिजाऊ अ हेल्पींग हँड ऑर्गनायझेशन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top