Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अखेर "त्या" नप उपाध्यक्षावर गुन्हा दाखल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अखेर "त्या" नप उपाध्यक्षावर गुन्हा दाखल आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गडचांदूर पोलिसांनी दाखल केला गुन्हा राजकीय वर्तुळात चर्च...
अखेर "त्या" नप उपाध्यक्षावर गुन्हा दाखल
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गडचांदूर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील शेतकरी विलास वासुदेव मांडवकर (वय 50) यांनी 11 सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी गडचांदूर पोलिसांनी काल दि. 14/9 रोजी रात्री उशिरा उपाध्यक्ष शरद जोगी व प्रशांत पाचभाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी पार्टीचे नेते व नप उपाध्यक्ष शरद जोगी व प्रशांत पाचभाई यांच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती  झाल्यानंतर मृत विलासच्या नातेवाइकांनी दोघांनाही अटक करण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून निदर्शन केले होते. दोषींवर कायदेशीर कारवाई करून अटक केल्यानंतरच मृतदेह उचलण्याच्या मागणीवर कुटुंबीय ठाम होते. भाजपचे शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, नीलेश ताजणे, नगरसेवक अरविंद डोहे, शिवसेना गटनेते व नगरसेवक सागर ठाकूरवार, मृतक विलासचा मुलगा व त्याचे नातेवाईक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर पोलिस ठाणेदार सत्यजित आमले यांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर मृतकाचे अंतिम संस्कार करण्यात आले.
दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा शवविच्छेदन अहवालानंतर गडचांदूर पोलिसांनी शरद जोगी आणि प्रशांत पाचभाई यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 306 आणि 34 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास गडचांदूर पोलीस करत आहेत. गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुढे काय होते याकडे सर्व राजकीय पक्षांसह स्थानिकांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, अटककेच्या भीतीने शरद जोगी आणि प्रशांत पाचभाई फरार झाल्याची बाबही सर्वत्र बोलली जात आहे. अजुनपर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक केलेली नाही अशी माहिती गडचांदुरचे पुलिस उप निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top