Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल गडचांदूर येथे मराठवाडा मुक्ती दिवसाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल गडचांदूर येथे मराठवाडा मुक्ती दिवसाचे आयोजन काढण्यात आली सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्यासंबंधी जनजागरण फेरी ध...
आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल गडचांदूर येथे मराठवाडा मुक्ती दिवसाचे आयोजन
काढण्यात आली सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्यासंबंधी जनजागरण फेरी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल गडचांदूर येथे मराठवाडा मुक्ती दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती अर्चना गोलछा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. 
या नंतर विद्यालयातील एन. सी. सी. कैडेट्स, स्काऊट व गाईड च्या विद्यार्थांनी ध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी कु. वेदांती मंदे व किंशुक दरवडे या विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झालीत. मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून यावेळी सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्यासंबंधी जनजागरण फेरी काढण्यात आली. प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला निलेश सर, ज्योती मैडम, पवन सर, संजय कन्नाके सोबतच शाळेतील सर्व शिक्षक, गैर शिक्षक कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top