Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विजेच्या धक्याने वायरमनचा जागीच मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विजेच्या धक्याने वायरमनचा जागीच मृत्यू आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क शेगाव - बेंबळा येथे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास गावातील वीपुरवठा सुरू क...
विजेच्या धक्याने वायरमनचा जागीच मृत्यू
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
शेगाव -
बेंबळा येथे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास गावातील वीपुरवठा सुरू करण्याकरिता विद्युत ट्रान्सफॉर्मरवर फ्यूज टाकत असताना विद्युत पुरवठा रिटर्न आल्याने विजेचा शॉक लागून वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
वायरमन पदावर कार्यरत असलेले अजय पुरुषोत्तम अलोने वय 51 वर्षे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे वायगाव (खडतकर), वायगाव (भोयर) व बेंबळा अशा तीन गावाचा कारभार आहे. या तिन्ही गावाचा वीज पुरवठा बंद असल्याने ते दुरुस्ती करिता बेंबळा येथील वीज ट्रान्सफॉर्मर (डीपी) वर जाऊन पाहिले असता फ्यूज गेला असल्याचे त्यांना आढळून आले. त्यावेळेस पाऊस सुरु होता तरी त्यांनी फ्यूज टाकण्याचा प्रयत्न केला असता अचानक रिटर्न वीज पुरवठा येऊन जोरदार विद्युत करंट लागल्याने अजय पुरुषोत्तम अलोणे या वायरमन चा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असता ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्यासह पिएसआय प्रवीण जाधव, अतुल कानवटे तसेच महावितरणचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top