Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वीज बिल दरवाढीची चौकशी करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वीज बिल दरवाढीची चौकशी करा  अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क भद्रावती - इंधन समायोजन आकार या नावाखाली महावितरण...
वीज बिल दरवाढीची चौकशी करा 
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
भद्रावती -
इंधन समायोजन आकार या नावाखाली महावितरण कंपनीने नुकतीच केलेली वीज दरवाढ ही संशयास्पद असून ग्राहकांवर अन्यायकारक आहे. वीज निर्मितीसाठी वाढलेल्या खर्चा पोटी वीज दरवाढीचा ग्राहकांनाच देण्यात आलेला हा मोठा धक्का असून महावितरण काहीतरी लपवाछपवी करत आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित दोशींवर कारवाई करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांच्या मार्गदर्शनात ग्राहक पंचायत भद्रावती यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार भद्रावती यांच्या मार्फत केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top