Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: त्या शेतकऱ्याची प्रकृती अजूनही नाजूक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
त्या शेतकऱ्याची प्रकृती अजूनही नाजूक चारही बाजुने गावाला पुराने वेढल्याने प्रकृती बिघडताच बैलबंडीने पाण्यातून वाट काढत रुग्णालयात करण्यात आल...
त्या शेतकऱ्याची प्रकृती अजूनही नाजूक
चारही बाजुने गावाला पुराने वेढल्याने प्रकृती बिघडताच बैलबंडीने पाण्यातून वाट काढत रुग्णालयात करण्यात आले होते दाखल
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
वर्धानदीच्या काठावर वसलेल्या पिपरी (देश) या गावाला पुराने चारही बाजुने वेढल्याने प्रकृती बिघडताच चक्क बैलबंडीने पाण्यातून वाट काढत शंकर ढवस या शेतकऱ्यास बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या शेतकऱ्यावर उपचार सुरू आहे. संसर्गजन्य आजार ताप व त्यातच शुगर लेवल कमी झाल्याने शंकर तडस यांची प्रकृती खालावली. यंदा गावाला पिपरी (देश) गावाला दुसऱ्यांदा पुराचा विळखा पडला असून गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने अशा स्थितीत ग्रामस्थांचे चांगलेच हाल होत आहे. दरम्यान अशा कठीण परिस्थितीत शंकर ढवस यांना ग्रामस्थांनी बैलबंडीतून चिखलमय रस्त्याने 3 किमीचे अंतर पार करीत रुग्णालयापर्यंत मार्ग काढला. ग्रामस्थांनी साहस केल्यानेच तो सुखरूप पुरातून बाहेर पडले. भद्रावती ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्याने शिंदे ट्रस्टच्या सहकार्याने या शेतकऱ्यास चंद्रपुरात दाखल करण्यात आले. परंतु, त्याची प्रकृती नाजूक असून उपचार सुरू आहे. दरम्यान तालुका प्रशासनातर्फे आरोग्य पथक गावातील नागरिकांची तपासणी करण्याच्या कामाला लागले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top