Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्व. हरिभाऊ डोहे विद्यालय येथे स्वातंत्र्यदिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्व. हरिभाऊ डोहे विद्यालय येथे स्वातंत्र्यदिन साजरा धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - स्व. हरिभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोर...
स्व. हरिभाऊ डोहे विद्यालय येथे स्वातंत्र्यदिन साजरा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
स्व. हरिभाऊ डोहे माध्यमिक विद्यालय कोरपना येथे 15 ऑगस्ट 2022 ला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मारोती पाटील रासेकर, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था कोरपना यांचे हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळेस मान्यवर मनोहर पाटील चेन्ने, नगरसेवक कोरपणा, मारोती पाटील पारखी, सेवा सहकारी संस्था सदस्य कोरपना, सौ .संगीताताई ईटणकर, सेवा सहकार सहकारी संस्था सदस्य कोरपना, संजय भाऊ ठावरी, माजी मुख्यधयापक कोरपना, पी.जी. उलमाले कोरपना, माननीय हेमंत लोडे, शब्बीर शेख तसेच शाळेचे मुख्याध्यापक विनोद यशवंतराव हेपट, शिक्षक एम.एम. पुपलवार, पी.एफ. मडावी, डी.एम. सोनटक्के, कु. वि.बी. गोरे मॅडम, शिपाई डी.एस.कोरवते व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्याने शालेय स्तरावर विविध स्पर्धा आयोजन केल्या होत्या. त्यामध्ये भाषण संघस्पर्धा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने कार्यक्रमात सहभागी घेऊन मोठ्या आनंदात स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top