Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संगोडा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य निघाली तिरंगा रॅली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संगोडा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य निघाली तिरंगा रॅली कोरपना ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या अध्यक्षेत पार पडला कार्यक्रम  धनराज...
संगोडा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य निघाली तिरंगा रॅली
कोरपना ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या अध्यक्षेत पार पडला कार्यक्रम 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य दि.14 ऑगस्ट 2022 ला ग्राम पंचायत सांगोडा येथे ’हर घर तिरंगा’ या कार्यक्रमाचे आयोजन घेत तिरंगा रॅली काढुन नागरिकांत जनजागृतीचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव ढाकणे ठाणेदार कोरपना व उदघाटक सरपंच सौ. संजना सचिन बोंडे, उपसरपंच सौ.ज्योती धोटे, मुख्याध्यापिक सौ.शोभा शेंडे, जयभाई, माजी सरपंच सचिन प्र. बोंडे, शासुस अध्यक्ष विकास अवताडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय कोल्हे, माजी सरपंच वामन मुसळे, ग्रा.प. सदस्य नवनाथ ढवस, विजय लांडे, बंडू भगत, सौ.सरिता देवाळकर, टेकाम, धांडे, शा.सु.स. उपाध्यक्ष, अनिल मोहितकर आणि पोलीस पाटील सौ. सुचिता पाचभाई व सर्व ग्रामवासी या रॅलीत उपस्थिती होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top