Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भाजपा गडचांदूरच्या वतीने ध्वजारोहन संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपा गडचांदूरच्या वतीने ध्वजारोहन संपन्न  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर -  भारताच्या 75 व्या स्वातंत्राच्या अमृत महोत्स...
भाजपा गडचांदूरच्या वतीने ध्वजारोहन संपन्न 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर - 
भारताच्या 75 व्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्याचे पालन करत सम्पूर्ण देश्यात मोठ्या उत्साहाने "हर घर तिरंगा" "हर मन तिरंगा" अभियान राबविण्यात आले. गडचांदूर शहरात सुद्धा भाजपाच्या वतीने "हर घर तिरंगा" लावण्याकरीता जन जागृती रॅली काढून तसेच पक्ष्या कडून मोफत तिरंगा वाटप करण्यात आले. नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन मोठ्या उत्साहात, स्वयंपूर्तीने 13 ऑगस्टला घरावर तिरंगा लावून शासनाच्या अभियानात सहभाग घेतला. तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय जनता पक्ष्याच्या कार्यलयाकडून 15 आगष्ट रोजी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्तम देवकर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष सतिश उपलेंचिवार, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, माजी नगरसेवक निलेश ताजने, शहर महामंत्री हरीश घोरे, संदीप शेरकी, महादेव जैस्वाल, गोपाल मालपाणी, इम्रान शेख, शर्मा, जीवतोडे, प्रतीक सदनपवार, राकेश अरोरा, जगन्नाथ कापसे, गजानन चिरडे, विलास क्षीरसागर, महेश घरोटे, भास्कर उरकुंडे, प्रवीण देवाळकर, माजी नगराध्यक्ष सौ. विजयालक्ष्मी डोहे, महिला आघाडी जिल्हा सचिव सौ. रंजना मडावी, सौ. सपना सेलोकर, कविता खाडे, सौ. सातपुते, निताताई क्षीरसागर, सुंदराबाई दाळे यांचे सह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top