Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला हत्या की आत्महत्या परिसरात चर्चा आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - राजुरा ते माणिकगड रेल्वे स्थानकाकड...
रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला
हत्या की आत्महत्या परिसरात चर्चा
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा ते माणिकगड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या बाजूला शनिवारी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह तीन ते चार दिवसांपासून पडून असल्याचा अंदाज आहे. राहुल खोब्रागडे वय 20 वर्षे असे मृतकाचे नाव आहे. मृतक तरुण शहरातील रमाबाई नगर येथील रहिवासी असून तो तीन दिवसांपासून बेपत्ता होता. हा युवक राजुरा नगरपालिकेच्या घंटागाडीला कामाला होता. 
तरुणाने आत्महत्या केली आहे की त्याचा खून करून मृतदेह येथे फेकून देण्यात आला याबद्दल परिसरात चर्चा सुरु आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top