POSCO कायदा, बेटी बचाओ, बेटी पढाओ, मुलांचा हक्क, बाल न्याय कायदा, शिक्षणाचा अधिकार विषयी दिली माहिती
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
चंद्रपूर जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरण कोरपना द्वारे महाराष्ट्र राज्य विधी सेवा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जुलै रोजी दिवाणी न्यायाधीश आर.आर. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अंबुजा विद्या निकेतन उप्परवाही येथे कायदेविषयक साक्षरता वा जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. विविध शासकीय योजनांबाबत विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत जागृकता निर्माण करण्यासाठी कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले.
POSCO कायदा, बेटी बचाओ, बेटी पढाओ, मुलांचा हक्क, बाल न्याय कायदा, शिक्षणाचा अधिकार इत्यादी सारखे उपक्रम आणि मुलांना संवेदनशील बनवणे जेणेकरून ते त्यांच्या हक्कांचे रक्षण करू शकतील आणि त्या कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून आणि उपेक्षितेपासून संरक्षण देऊ शकतील.
कार्यक्रमाची सुरूवात इंग्रजी विभागाचे मोनोतोष डे यांच्या प्रास्ताविकाने झाली. प्राचार्य राजेश शर्मा यांनी स्वागतपर भाषण केले. शिबिरातील प्रमुख वक्त्यांमध्ये आर.आर. थोरात, ए.जे. पाटील, उपन्यायदंडाधिकारी आणि आनंदा धुर्वे गटशिक्षणाधिकारी, अॅड. दिपांजली प्रशांत मंथनवार इंटरनॅशनल जस्टीस अॅड. श्रीनिवास मुसळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दोन तासच्या या शिबिराची सांगता शाळेचे समन्वयक अंबर त्रिवेदी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. संचालन कु. सोनु तिवारी या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.